केंद्रीय शालेय बाल क्रीडा व कला संमेलन उत्साहात

108

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

एटापल्ली : येथील एटापल्ली तालुक्यातील कसनसूर केंद्राचे दोन दिवसीय शालेय बाल क्रीडा व कला संमेलन उत्साहात पार पडले.

या शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन कसनसूरच्या सरपंच कमला हेडो यांच्या हस्ते करण्यात आले. सहउद्घाटक म्हणून माजी सभापती बबिता मडावी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती राकेश कोपूलवार होते. विशेष पाहुणे म्हणून सहायक पोलिस निरीक्षक कैलास बेले, विलास कोंदामी, वनिता गोटा, गीता उसेंडी, नीलिमा गोटा, संध्या कन्नलवार, माजी सरपंच सुनिल मडावी, घीसा मडावी, रावजी मडावी, कुळेयेटी, ग्रामविकास अधिकारी गुरुदास मडावी, भूपेंद्र सर, मदनकर, महावितरणचे अभियंता मयूर गोहने, रामा गावडे, बारसू उसेंडी, राजू लेनगुरे, दुर्गा मोहरले, उमेश नरोटे, मोतीराम उसेंडी, मनोज गोटा, रमेश पोटावी, प्रमोद बरवा व सर्व सदस्य उपस्थित होते. केंद्र संमेलन आयोजक केंद्रप्रमुख डॉ. प्रभाकर साखरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रभाकर साखरे यांनी केले तर उद्घाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक शिरीष ईरावार यांनी केले. सामन्यांचे समालोचन सचिन वाकडे, रोशन कुलसंगे यांनी केले. केंद्र कसनसूरच्या सर्व मुख्याध्यापक, शिक्षकांनी या संमेलनासाठी सहकार्य केले.

———————————–