प्रणोती निंबोरकर यांनी घेतले माजी खासदार डाॅ. अशोक नेते यांचे आशीर्वाद

91

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १८ : आपल्या भारतीय संस्कृतीत कोणतेही मोठे कार्य पूर्ण करण्यासाठी थोरा-मोठ्यांचा आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे. याच परंपरेला अनुसरून गडचिरोली नगर परीषद निवडणुकीत भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणोती सागर निंबोरकर यांनी पक्षातील वरीष्ठ नेत्यांचे आभार मानत त्यांचे आशीर्वाद घेतले. नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी माजी खासदार डॉ. अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात जात त्यांचे आशीर्वाद घेतले.

यावेळी नेते यांनी प्रणोती निंबोरकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत अभिनंदन केले.माजी खासदार तथा भाजप अनुसुचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी त्यांना आशीर्वाद देत आगामी निवडणुकीत भक्कम विजयासाठी शुभेच्छा दिल्या, तरुण नेतृत्वाच्या माध्यमातून शहरात विकासाचे नवे पर्व सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी प्रणोती निंबोरकर यांचे पती सागर निंबोरकर, डॉ. भारत खटी व संजय बारापात्रे उपस्थित होते.

———————————-