गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा देण्याचा अॅड. प्रणोती निंबोरकर यांचा संकल्प

135

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २० : नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा धडाक्यात शुभारंभ करत नव्या विचारांचा नवा प्रवास सुरू करत असलेल्या अॅड. प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांनी गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा देण्याचा संकल्प करत गुरुवार (ता. २०) जनसंपर्क मोहिमेला वेग दिलला आहे. प्रभाग क्र. १३ मध्ये घराघरांत जाऊन नागरिकांशी संवाद साधत त्यांनी जनसमस्या जाणून घेतल्या व या समस्या सोडवण्याचा विश्वास दिला.

प्रभागातील विविध भागांतील रहिवाशांशी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या स्थानिक समस्या, विकासाच्या गरजा आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी अॅड. प्रणोती निंबोरकर यांनी जाणून घेतल्या. शहराचा सर्वांगीण विकास, सुंदर व स्वच्छ गडचिरोली आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांची हमी देण्याचा निर्धार त्यांनी या भेटीदरम्यान व्यक्त केला. नागरिकांनीही ‘ताई आपली हक्काची’ या भावनेने त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असल्याचे सांगत गडचिरोलीच्या विकासावर मनसोक्त चर्चा केली. अनेक ठिकाणी नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. या जनसंपर्क मोहिमेदरम्यान नगरसेवक पदासाठीचे उमेदवार देवाजी लाटकर, पुष्पाताई करकाडे आणि भारतीताई नवघडे उपस्थित होते. त्यांच्या सहभागामुळे या मोहिमेला अधिक बळ मिळाले. प्रभाग क्र. १३ मध्ये झालेल्या या भेटीत सकारात्मक वातावरण, नागरिकांचा विश्वास आणि विकासाच्या दिशेने दृढनिश्चय या सर्वांचा सुंदर मेळ पाहायला मिळाला. नागरीकांचा उत्साह आणि ताईंवरील विश्वास पाहता आगामी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये प्रभाग क्रमांक १३ मध्ये बदलाची नवी चाहूल लागली आहे. अॅड. प्रणोती निंबोरकर यांना जनतेचा भरभरून आशीर्वाद मिळत आहे.

——————————