नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनतर्फे अॅड. प्रणोती सागर निबोंरकर यांचे स्वागत

314

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ८ : गडचिरोली नगरपालिकेच्या नवनियुक्त नगराध्यक्ष अॅड. प्रणोती सागर निबोंरकर यांनी आज गुरुवार ८ जानेवारी रोजी आपल्या पदाचा अधिकृतरित्या पदभार स्वीकारला. या पदभार स्वीकार समारंभानंतर गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी नगराध्यक्ष अॅड. प्रणोती सागर निबोंरकर यांची भेट घेऊन त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी असोसिएशनच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी असोसिएशनचे संयोजक उदय धकाते तसेच संयोजक तिलोत्तमा समर हाजरा प्रामुख्याने उपस्थित होते. नगराध्यक्ष अॅड. प्रणोती सागर निबोंरकर यांनी माध्यमांशी संवाद साधत गडचिरोली शहराच्या विकासासाठी पारदर्शक, लोकाभिमुख आणि सकारात्मक प्रशासन देण्याचा मानस व्यक्त केला. शहरातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, नागरी समस्या तसेच विकासकामांवर प्राधान्याने लक्ष दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. गडचिरोली ऑफ मीडिया असोसिएशनच्या वतीने नगराध्यक्षांना त्यांच्या नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. प्रशासन आणि माध्यमे यांच्यात समन्वय राखून शहरहिताचे कार्य करत जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या समस्या नगर प्रशासनापर्यंत पोहोचवण्याची भूमिका माध्यमे पार पाडतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.