Home Gadchiroli गडचिरोलीत पारंपरिक वेशभूषेत महिलांची भव्य बाईक रॅली

गडचिरोलीत पारंपरिक वेशभूषेत महिलांची भव्य बाईक रॅली

121

ग्लोबल गडचिरोली न्यूज

गडचिरोली, ता. १८ : मराठी नववर्षाच्या गुढीपाडवा पूर्वसंध्येला गडचिरोली येथे महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. आधारविश्व फाउंडेशन आणि लोकमत सखी मंच, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. १८ मार्च २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता ही रॅली पार पडणार आहे.

रॅलीचा प्रारंभ आरमोरी रोडवरील परिणीता लॉन येथून होणार असून इंदिरा गांधी चौक, चंद्रपूर रोड आयटीआय चौक, त्यानंतर पुनः इंदिरा गांधी चौक मार्गे धानोरा रोड, शिवाजी महाविद्यालय, रेड्डी गोडाऊन, पोटेगाव बायपास, चामोर्शी रोड असा मार्गक्रमण करत राधे बिल्डिंगसमोर समारोप होणार आहे. समारोपानंतर सहभागींसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले आहे.

या रॅलीमध्ये पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशभूषेला विशेष प्राधान्य देण्यात आले असून महिलांनी लुगडं, साडी, नथ अशा पारंपरिक पेहरावात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. सहभागी महिलांनी दुपारी २.०० वाजता फेटे बांधण्यासाठी उपस्थित राहावे. मोठ्या संख्येने (१०० पेक्षा अधिक) महिला सहभागी होणार असल्याने फेटे बांधण्याची व्यवस्था दुपारी १.०० वाजल्यापासून सुरू करण्यात येणार आहे. फेट्यासाठी प्रत्येकी ५० रुपये शुल्क ठेवण्यात आले असून रॅली संपल्यानंतर फेटे परत करणे आवश्यक आहे.

रॅली शिस्तबद्ध व सुरक्षित पार पाडण्यासाठी आयोजकांनी विशेष सूचना दिल्या आहेत. प्रमुख पाहुणे व आयोजकांच्या मागे दोन-दोन वाहनांच्या क्रमाने सावकाश रॅली निघणार असून कोणत्याही प्रकारची घाईगडबड टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी लवकरात लवकर आपली नावे नोंदवावीत, असेही आयोजकांनी सांगितले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :

प्रा. सुनिता साळवे – ९४२३१२२९३४

प्रा. वीणा महाजन – ९४२२७०९०००

प्रा. विजया मने – ९४२१७३४४३४

रश्मी आखाडे – ७०३८६४७७३३

भाग्यश्री गड्डमवार – ९४०५१५५६२८

गुढीपाडव्याच्या निमित्ताने महिला सक्षमीकरण आणि मराठी संस्कृतीचा जागर करण्यासाठी ही रॅली एक प्रेरणादायी उपक्रम ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.