दोन संस्कृतीचा संगम साधणाऱ्या सौ. बिनाराणी देवरावजी होळी .

497

माहेर वंगभूमीशी बांधलेलं तर सासर आदिम संस्कृतीचा वारसा जपणारं…अशा या बंगाली आणि आदिवासी दोन्ही संस्कृतीचा संगम साधणाऱ्या आमदार डाॅ.देवरावजी होळी यांच्या पत्नी सौ.बिनाराणी होळी एक अनोखं व्यक्तीमत्व आहेत. आज आमदार पतीची पत्नी म्हणून समाजात वावरत असल्या तरी हे मोठेपण त्यांनी कधीच मिरवलं नाही. आपल्या पतीची सावली होऊन त्यांच्या संघर्षात सदैव खंबीरपणे उभ्या राहिल्या. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. सौ.बिनाराणी होळी यांच्या बाबतीत हे तंतोतंत सत्य आहे. डाॅ. देवराव होळी याना आमदार व्हायचे होते. त्यांनी आपल्या वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं होतं. अण् व्यवसाय उत्तमरित्या चालत असताना त्यांनी राजकारणात येऊन देशाची, समाजाची सेवा करायचं ठरवलं तेव्हा हा या दोघांच्याही आयुष्यातील महत्त्वाचं टप्पा होता. अशा वेळी एखाद्या सर्वसाधारण महिलेने आपल्या पतीला ‘सुखाचा जिव कशाला दु:खात टाकता’, असं सांगत तोच व्यवसाय करायला सांगितलं असतं. पण सौ.बिनाराणी सर्वसाधारण नाहीतच. आपल्या पतीच्या डोळ्यात तरळणारं स्वप्न त्यांनी स्वत: हृदयात उतरवलं. ते स्वप्न सत्यात आणण्यासाठी पतीसोबत त्यांनीही कष्ट उपसले. दोन्ही संस्कृतीचे पाईक असलेलं आपलं गणगोत जसं सांभाळलं तसच पक्षातील कार्यकर्त्यांनाही आईच्या ममतेनं वागवलं, परीवारातील सदस्यांप्रमाणेच त्यांना वागणूक दिली. आजही त्या तशाच प्रेमळ, सदैव हसतमुख आणि विनम्र व्यक्तिमत्त्वाच्या आहेत. व्यक्ती लहान असो की मोठा असो संघर्ष कुणालाच चुकलेला नाही. पण आलेल्या प्रत्येक संकटावर हसतमुख होऊन मात करणारे, संघर्षातही आपलं धैर्य न गमवणारे आणि यश मिळाल्यावरही हुरळून न जाता हृदयातील मायेचा पाझर सदैव जपणारे फार थोडके असतात. अशा दुर्मिळ लोकांमध्ये सौ. बिनाराणी होळी यांची गणना केल्यास वावगे ठरू नये. श्रीमंती पायाशी लोळण घेत असतानाही त्या केवळ संसारात, सुखात न रमता समाजासाठी धडपडत राहतात. बंगाली संस्कृती आणि आदिवासी संस्कृतीच्या सगळ्या प्रथा, परंपरा निष्ठेने पार पाडतात, अडल्या, नडल्या, गोरगरीबांसाठी धावून जातात. पतीच्या प्रत्येक कार्याला पूर्णत्व देण्यासाठी झटतात. पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या स्वत:वर प्रसिद्धीचा झोत कधीही पडू देत नाहीत. म्हणूनच आज त्यांच्याविषयी लिहायचं ठरवलं. त्यांच्यात प्रचंड उर्जा आहे, कर्तृत्व आहे, सद्गुण आहेत, पंरपरांना ज्या प्रमाणे जपतात तसच वेळप्रसंगी कालबाह्य ठरलेल्या बुरसट परंपरांना, जातीभेद, धर्मभेद, संस्कृती भेदाला ठोकर मारण्याची धमकही त्यांच्यात आहे. डाॅ. देवराव होळी यांच्याशी लग्न करून आणि आपला संसार यशस्वी करून दाखवत त्यांनी हे सिद्धच केले आहे. अशा या धाडसी, कार्यतत्पर, विनम्र आणि विलोभनीय व्यक्तीमत्त्वाला वाढदिवसानिमित्त ग्लोबल गडचिरोली पोर्टलच्या वतीने कोटी कोटी शुभेच्छा ! त्यांच्या मनातील सर्व इच्छा, आकांक्षा तसेच त्यांनी आपल्या पतीसोबत पाहिलेली सर्व स्वप्ने पूर्ण व्हावीत हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!!

– तिलोत्तमा हाजरा, मुख्य संपादक, ग्लोबल गडचिरोली न्यूज पोर्टल

—————————————–