ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. १२ :
गडचिरोलीपासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या गडचिरोली- आरमोरी- नागपूरमार्गावरील वसा येथील सद्गुगुरु पेट्रोल पंपावर बॅटरीमध्ये शाॅर्ट सर्किट झाल्याने ट्रक पेटला. ही घटना रविवार १२ मे रोजी दुपारी घडली. चालक व क्लिअर प्रसंगावधान राखत ट्रकबाहेर आल्याने जीवितहानी टळली.
वसा येथील सद्गुगुरु पेट्रोल पंपावर एका ट्रक चालकाने ट्रक उभा केला. ट्रकचे इंजिन गरम झाल्याचे लक्षात येताच चालक व क्लिनर दोघेही ट्रकच्या खाली उतरले. त्यानंतर ट्रकने अचानक पेट घेतला. यावेळी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी धावपळ करत ट्रकची आग विझवण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे गडचिरोली शहर अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर असताना अग्निशामक वाहन पोहोचू शकली नव्हते. सुदैवाने ट्रकचालकाने ट्रक हा पेट्रोल पंपापासून लांब अंतरावर उभा केल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा संपूर्ण पेट्रोल पंपच आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याचीही शक्यता होती. यावेळी पेट्रोल पंपावर काही वाहने देखील उभी होती. ट्रकच्या बॅटरीमध्ये तांत्रिक बिघाड येऊन शाॅर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे.
———————————–









