गडचिरोली जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९४. ४२ टक्के

130

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २१ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावी परीक्षेचा निकाल २१ मे २०२४ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर झाला. जिल्ह्याचा एकूण निकाल ९४.४२ एवढा लागला असून नागपूर विभागात जिल्ह्याने तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर घोषित झालेल्या निकालानुसार जिल्ह्यातून बारावीला १२ हजार ५१३ प्रविष्ठ होते. प्रत्यक्षात १२ हजार ३५३ विद्यार्थ्यांनी (मुले ६२६८, मुली ६०८५) परीक्षा दिली. यापैकी ११ हजार ६६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ५ हजार ८२६ मुले व ५ हजार ८३८ मुलींचा समावेश आहे. म्हणजे उत्तीर्ण झालेल्यांमध्ये मुलींची संख्या अधिक असल्याने निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्याचा निकाल ९४. ४२ टक्के लागला आहे.