१० वी मध्ये चामोर्शी तालुक्यातून प्रथम
चामोर्शी तालुक्यातून व यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय दुर्गा शंकर मंडरे 94. 60 टक्के घेऊन प्रथम क्रमांक पटकावला
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
दि. 1 जून 2024 चामोर्शी
चामोर्शी येथील दुर्गा शंकर मंडरे ही 10 वीच्या परीक्षेत 94. 60 टक्के घेऊन चामोर्शी तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावलाआहे. तिची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून व आई वडील मोल मंजूरी करून संसाराचा गाळा चालवीतात. अशा विपरित परिस्थितीवर मात करत तिने यश संपादक केले याबद्दल आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी तिचे विशेष कौतुक केले. आज त्यांच्या निवासस्थानी जावून शाल पुष्पगुच्छ देऊन तिच सत्कार केले आणि तिच्या पुढच्या भविष्यासाठी तिला सुभेक्षा दिले.
यावेळी शंकर मंडरे, आशा मंडरे यांच्या परिवारातील सदस्यांसह प्रदीप भांडेकर सर, जिल्हा सचिव दिलीप चलाख, युमो शहर अध्यक्ष निखिल धोडरे, सुरेश गद्दे, अरुण कपाट उपस्थित होते









