रुग्णांची आस्थेने विचारपूस करून वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले सूचना.
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
दिनांक १जून २०२४ गडचिरोली.
गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी आज गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाला आकस्मिक भेट देऊन रुग्णालयाची आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली.आणि
रुग्णालयातील विविध वार्डात जावून भरती असलेल्या रुग्णांसोबत संवाद साधला व त्यांची आस्थेने विचारपूस केली. यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णांची यथायोग्य काळजी घेण्याची सूचना केली. याप्रसंगी जिल्हा सह शल्यचिकित्सक डॉ सोळंकी व वैद्यकीय अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.









