Home मराठी विजांपासून सावध रहा : आमदार डाॅ. होळी

विजांपासून सावध रहा : आमदार डाॅ. होळी

128

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ७ : बदलत्या वातावरणामध्ये विजा कोसळून मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. म्हणून पावसाळ्यात विजांचा कडकडाट सुरू असताना घरा बाहेर पडताना काळजी घ्यावी व सावध राहावे, असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी यांनी जनतेला केले आहे.

६ जून रोजी आलेल्या आकस्मिक वादळ, वारा, पाऊस व विजांच्या कडकडाटांमध्ये काही ठिकाणी नागरिक मृत्यूमुखी पडण्याच्या दुर्दैवी घटना घडल्या. या घटना अत्यंत दु:खद आहेत. गुरुदेव मनिराम गेडाम (वय ४२)रा. गोवर्धन (कूनघाडा रै) व वैभव देवेंद्र चौधरी (वय २१) रा. शंकरपूर हेटी यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचे दुःखद निधन झाले. ही बाब आमदार डाॅ. होळी यांना माहित होताच त्यांनी तत्काळ रुग्णालयात जाऊन मृतांच्या परीवाराची भेट घेतली व मृतांच्या परीवाराचे सांत्वन केले. जनतेने अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आमदार डाॅ. होळी यांनी केले आहे.

———————————–