ग्लोबल गडचिरोली न्यूज,
दिनांक :- 21/06/2024
गडचिरोली:- भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा गडचिरोली च्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा ..
आंतरराष्ट्रीय योग दिन भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गीताताई हिंगे यांच्या नेतृत्वात त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या टेरेसवर साजरा करण्यात आला. यावेळी योग दिवसाला अनुसरून गीताताई यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी त्या म्हणाल्या,
आपल्या देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून 21 जुन 2015 पासून दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग्य दिवस साजरा केला जातो.
योगाचे अनेक फायदे आहेत. निरोगी आयुष्यासाठी योगासन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.योगामुळे शुगर, बद्धकोष्ठता यांसारख्या आजारांशी लढण्यासही मदत होते. मनःशांती आणि उत्तम आरोग्यासाठी योग अतिशय आवश्यक आहे.
हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी तंदुरुस्ती वाढणे, स्नायूंची शक्ती सुधारणे आणि रक्तदाब सामान्य करणे यासह अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात.
आजच्या धावपळीच्या युगात सर्वानी योगा करून तंदुरुस्त रहाणे अतिशय गरजेचे आहे..
यावेळी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीता ताई हिंगे यांसोबतच, जिल्हा सचिव वर्षाताई शेडमाके, जिल्हा महामंत्री सीमाताई कन्नमवार, प्रतिमा सोनवणे, भारती खोब्रागडे, सुनीता आलेवार, भूमिका बरडे, वैष्णवी डोंगरे, भूमी कोंडावार व भाजपच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.









