ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २४ : आमदार डाॅ. देवराव होळी यांच्या अथक प्रयत्नातून मार्कंडा देवस्थानाच्या विकासासाठी ९९ कोटी ११ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून एमएसआरडीसीकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आता कामाची जबाबदारी आली आहे. त्यामुळे रखडलेल्या कामाला गती मिळणार आहे. आमदार डॉ. देवराव होळी यांनी मार्कंडा देवस्थानाच्या या कामाच्या नियोजनाची पाहणी केली.
या देवस्थानाच्या विकासासाठी ९९ कोटी ११ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार डॉ. देवराव होळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितपवार व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हावासींच्या वतीने आभार मानले आहेत. मुख्य मंदिराच्या जीर्णोद्धार व संवर्धनाकरिता २० कोटी ८१ लाख रुपये, नदीच्या पलीकडे पोहोचण्यासाठी भाविकांसाठी पुलाची निर्मिती २०० मीटर लांब ५ कोटी ५० लाख रुपये, धर्मशाळांची सुधारणा १ कोटी रुपये, घाट व कपडे बदलण्याच्या जागेसह नदी परिसराचे सुशोभीकरण १५ कोटी ८६ लाख रुपये, मूलपासून ५ मीटर रुंदीच्या रस्ता बांधकामासाठी १७ कोटी ५० लाख रुपये ,घाट व कपडे बदलण्याच्या जागेसह नदी परिसराचे सुशोभीकरण १ कोटी ८३ लाख, माहिती केंद्र (८०० चौरस मीटर) ६ कोटी ५० लाख रुपये अशा प्रकारे मार्कंडा देवस्थानाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याबद्दल आमदार डाॅ. होळी यांनी राज्य सरकारचे आभार मानले असून कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी, अशी मागणी केली आहे. यावेळी उपसरपंच उमाकांत जुनघरे, गजानन भांडेकर, साखरवाडे, बांधकाम विभाग बड्डे, मृत्यूंजय गायकवाड, पुरातत्व विभागाच्या शिवानी शर्मा, जिल्हा सचिव दिलीप चलाख, तालुका उपाध्यक्ष जैराम चलाख, भाजप ज्येष्ठ नेते भाऊजी दहेलकर, भाजयुमो उपाध्यक्ष प्रतीक राठी, वसंत चौधरी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य भोजराज भगत, विशेष दोषी, रामचंद्र वरवाडे, प्रिया मरस्कोल्हे, सुषमा आत्राम, यांच्यासह स्थानिक नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.









