गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील समस्यांबाबत  गुरुवारला उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांचे सोबत  बैठक

101
  • उपमुख्यमंत्र्यांनी दिली आपल्या अधिकाऱ्यांना बैठक लावण्याची सूचना
  • ग्लोबल गडचिरोली न्यूज,
  •   गडचिरोली  विधानसभा क्षेत्रातील  समस्या सोडविण्यासाठी या अधिवेशन कालावधीत  बैठकीचे आयोजन करावे अशी आमदार डॉ देवरावजी होळी यांनी  उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे  केली होती मागणी*

 

गडचिरोली मेडिकल कॉलेज, गोंडवाना विद्यापीठ, नवीन विमानतळ ,जिल्हा स्टेडियमचे बांधकाम, विविध उपसा सिंचन योजना ,  सार्वजनिक बांधकाम विभाग निधी अनियमितता, कोनसरी लोह पोलाद प्रकल्प ,  विविध प्रशासकीय भवनांना निधी, ओबीसी विद्यार्थ्यांच्या वस्तीगृह संदर्भातील समस्यां मार्गी लावणे इत्यादी बाबत बैठक लावण्याची केली विनंती*

 

*दिनांक  १ जुलै २०२४ मुंबई*

 

*गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे.  मात्र काही विषयांना प्राधान्याने मार्गी लावण्याची आवश्यकता असून त्या दृष्टीने आपण  या अधिवेशन कालावधीत बैठकीचे आयोजन करावे  अशी  मागणी   पत्राच्या माध्यमातून राज्याचे  उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे केली असता त्यांनी येत्या गुरूवारला बैठक लावण्याची सूचना आपल्या विभागाच्या अधिकाऱ्यांना  केली.*

 

*बैठकीमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजच्या संदर्भातील असणारे विविध प्रश्न,  या शैक्षणिक सत्रापासून प्रवेश सुरू करणे , पीएमसी ची नियुक्ती करणे, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे नवीन बांधकाम,  पीएमसी नियुक्ती करणे ,गडचिरोली नवीन विमानतळाच्या निर्मिती संदर्भातील कार्यवाही करणे, गडचिरोली जिल्हा स्टेडियमचे संथ गतीने होणारे बांधकाम तातडीनं करणे,  दुसऱ्या टप्प्यातील अंदाजपत्रकास मंजुरी देणे,  पीएमसी ची मान्यता व वन विभागाचे असणारे अतिक्रमण काढणे, गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील राजीव गांधी उपसा सिंचन भेंडाळा तालुका चामोर्शी , वसा पोर्ला उपसा सिंचन योजना तालुका गडचिरोली यांची  पीएमसी च्या मार्फत निवीदा प्रक्रिया करून काम सुरू करणे,कोनसरी पोलाद प्रक्रियेत जमीन अधिग्रहण करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेणे व त्यांच्या मागणीनुसार जमिनीचा मोबदला देणे, गडचिरोली नगरपरिषद क्षेत्रांतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजना व वाढीव गटार लाईन योजनेच्या प्रलंबीत प्रस्तावांना मंजुरी देणे,  धानोरा व चामोर्शी नगरपंचायत अंतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देणे,  गडचिरोली,  धानोरा  व चामोर्शी  तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल मिळण्यास होणाऱ्या अडचणी दूर करून त्याविषयीच्या  उपाययोजना करणे, गडचिरोली जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता १ व कार्यकारी अभियंता २ येथील निधी वितरणामध्ये  होणारी अनियमितता व  बजेट मधील निधी कामानुसार वितरित करणे, गडचिरोली जिल्हाधिकारी  कार्यालयाच्या नव्या बांधकामास मंजुरी देणे, जिल्हा परिषदेच्या  नवीन प्रशासकीय भवनांस मंजुरी देणे , गडचिरोली जिल्ह्यात नव्याने  सर्किट हाऊस  (विश्रामगृह) बांधकाम करणे,  गडचिरोली, धानोरा  व चामोर्शी   पंचायत समितीच्या प्रशासकीय भवनांना मंजुरी देणे,  गडचिरोली जिल्ह्यामध्ये वाघ, हत्ती व इतर हिंसक वन्यप्राणामुळे मृत्यू झालेल्या  परिवारांना आर्थिक भरपाई शासकीय  नौकरी देणे व हिंसक वन्य प्राण्यांपासून मृत्यू टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे,गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहासंदर्भात  असणाऱ्या समस्या दूर करणे,यासह इत्यादी विषय या बैठकीत घेऊन  मार्गी लावावेत अशी विनंती पत्राच्या माध्यमातून आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली असून त्या दृष्टीने या गुरुवारला बैठक लावण्याची सूचना  राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री  ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे.