आमदार डॉ देवरावजी होळी
आपण केलेले काम बूथ व लोकांपर्यंत सांगण्यात कमी पडल्याने लोकसभेत अपयश.
चुकीची पुनरावृत्ती न करता जनतेत जावूनं केलेली काम सांगा
धानोरा येथे भाजपा तालुका व शहर पदाधिकारी कार्यकारिणी बैठक संपन्न
ग्लोबल गडचिरोली न्यूज ,
दिनांक १६ जुलै धानोरा
मागील ७५ वर्षाच्या काळात कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर धानोरा तालुक्यात कामे झालीत मात्र त्या झालेल्या कामांची माहिती आपल्या बुथापर्यंत व जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडल्याने लोकसभेत पराभव स्विकारावा लागला त्यामुळे येणाऱ्या काळात आपण केलेले काम बूथ व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी धानोरा येथे भाजपा तालुका व शहर कार्यकारणीच्या बैठकीप्रसंगी केले.
- यावेळी माजी खासदार अशोकजी नेते , माजी आमदार डॉक्टर नामदेवरावजी उसेंडी, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे , जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,भाजपा नेत्या चंदाताई कोडवते , डॉ कोडवते, भाजपा तालुका अध्यक्ष लताताई पुंघाटी, शहर अध्यक्ष सारंग साळवे , भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शशीकांतजी साळवे नगरसेवक संजू कुंडू, साजनजी नगरसेवक यांचे सह तालुक्यातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख व पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.









