आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे लाडक्या बहिणींना उपस्थित राहण्याचे आवाहन
भेंडाळा येथे सकाळी ११ वाजता तर बोरी येथे दुपारी २ वाजता होणार मेळावा
महिला प्रभाग संघाच्या सभागृहांचे भूमिपूजनही होणार
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना, तीर्थ दर्शन योजना, यांची नोंदणी केली जाणार
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
दिनांक २४ सप्टेंबर गडचिरोली
राज्याचे लाडके मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस (देवा भाऊ) यांच्या लाडक्या बहिणींचा मेळावा चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा व लखमापूर बोरी जिल्हा परिषद क्षेत्रा अंतर्गत नियोजित करण्यात आला असून दिनांक २६ सप्टेंबर रोजी भेंडाळा येथे सकाळी ११ वाजता तर बोरी येथे दुपारी २ वाजता होणार आहे तरी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले आहे.
हा मेळावा भेंडाळा येथे श्री साई कॉम्प्लेक्स परिसर भेंडाळा येथे सकाळी ११ वाजता होणार असून दुपारी २ वाजता बोरी येथील ग्रामपंचायत पटांगण परिसरात आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना, तीर्थ दर्शन योजना, यांची नवीन नोंदणी करण्यात येणार आहे. तसेच आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी निधी उपलब्ध करून दिलेल्या महिला प्रभाग संघाच्या सभागृहांचे भूमिपूजनही करण्यात येणार आहे. तरी या मेळाव्याला लाडक्या बहिणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.