ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ५ : अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी महत्त्वपूर्ण काष्ठ (लाकूड) सा⁵मुग्री शनिवार (ता.५) औपचारिकपणे रवाना करण्यात आले.
याप्रसंगी स्थानिक अधिकारी, वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि भक्तगण उपस्थित होते. या काष्ठाचा वापर राम मंदिराच्या बांधकामात महत्त्वपूर्ण भाग म्हणून होणार आहे. आलापल्ली हे वनसंपत्तीसाठी प्रसिद्ध असून या ठिकाणाहून मिळणारे काष्ठ प्राचीन काळापासून धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यांसाठी वापरले जाते. श्रीराम मंदिराच्या बांधकामात योगदान देणे हा अल्लापल्ली वनपरिक्षेत्रासाठी मोठा गौरव मानला जात आहे. त्याचबरोबर अतिदुर्गम भाग मानल्या जाणाऱ्या आलापल्ली नगरीचे नाव हे प्रभू रामाच्या अयोध्येशी कायमस्वरूपी जोडले जाणार आहे. या लाकडाच्या शिल्पकलेत महत्त्वाची भूमिका असलेल्या काष्ठशिल्पकारांनी सांगितले की, ते मंदिराच्या मूळ वास्तुकलेला साजेशी उत्कृष्ट कलाकुसर घडवणार आहेत. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या बांधकामाला जगभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, आणि आजची ही घटना त्या उत्साहात भर घालणारी ठरली आहे. यावेळी प्रामुख्याने आलापल्ली वनविभागाचे उपविभागीय वना धिकारी श्री.पवार, वनपरीक्षेत्र अधिकारी गौरव गणवीर, क्षेत्र सहायक बुध्दावार, वनपाल राजूरकर, वनपाल रंगूवार, वनपाल तावडे, वनरक्ष मडावी,वनरक्षक पाशा, वनरक्षक दहागांवकर,वनरक्षक तुषार मडावी,वनरक्षक साहिल झाडे,वनरक्षक अलोणे,वनरक्षक निलेश टेकाम,वनरक्षक मुंडे,वनरक्षक यमगर,वनरक्षक सुरवासे, वनमजूर बंडू रामगिरवार,वनमजूर मल्लेश आदी उपस्थित होते.









