अमृत आहार स्वयंपाकी महिलांनी केले आंदोलन

133

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

कुरखेडा, ता. ६ : डाॅ एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत स्वयंपाक करणाऱ्या महिलांना केवळ एक हजार रुपए मानधन मिळत असल्याने मानधनात सात हजार रुपए वाढ करून मिळावी व थकीत असलेले मानधन मिळावे, याकरिता स्वयंपाकी महिलानी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे व निदर्शने आंदोलन केले.

डाॅ एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार जिल्हा महिला संघटनेचे प्रमुख कृष्णा चौधरी यांच्या नेतृत्वात केलेल्या आंदोलनात आरमोरी- वडसा -कुरखेडा- कोरची धानोरा तालुक्यातील बहुसंख्य स्वयंपाकी महिला उपस्थित होत्या. मानधन मिळालेच पाहीजे, मानधनात वाढ झालीच पाहीजे, मानधनात वाढ झाली नाही तर बेमुदत उपोषण करण्यात येईल, अशा घोषणा देण्यात आल्या. उप विभागीय अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारले व मुख्यमंत्र्यांना तत्काळ पाठविण्याचे आश्वासन दिले. स्वयंपाकी महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्ष गीता उईके, सचिव सरीता गावडे, उपाध्यक्ष अंजू गेडाम, वडसा तालूकाध्यक्ष प्रियंका रामटेके, तालूका कुरखेडा संघटीका दीपाली बावणे, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे, प्रदेश सचिव केशव सामृतवार, विधानसभा क्षेत्र प्रभारी प्रदीप भैसारे, कार्यालयीन सचिव अशोक खोब्रागडे, ज्येष्ठ कार्यकर्ता दादाजी धाकडे, अॅड. उमेश वाल्दे, सूरज गावतूरे व इतर संघटनेचे पदाधिकारी व बहुसंख्य स्वयंपाकी महिला उपस्थित होत्या.

—————————————