कुछ तो गडबड है दया…डाॅ. होळी चक्क डाॅ. नरोटेंच्या बैठकीत

88

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ३ : भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने रूसलेले आमदार डाॅ. देवराव होळी ३ नोव्हेंबर रोजी डाॅ. मिलिंद नरोटे यांच्या प्रचारार्थ आयोजित तेली समाजाच्या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे हे त्यांचे अपक्ष उमेदवारी मागे घेतल्याचे संकेत दिसत असून कुछ तो गडबड है दया…अशी शंका राजकीय क्षेत्रात व्यक्त होत आहे.

विधान परिषदेचे आमदार परीणय फुके यांच्या उपस्थितीत स्थानिक स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेज येथे भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या प्रचारार्थ तेली समाजची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी सर्व तेली बांधवांना मार्गदर्शन केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजप विधानसभा संयोजक प्रमोद पिपरे होते. त्यांच्याच बाजुला गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ.देवराव होळी उपस्थित होते. तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर,रवींद्र भांडेकर, मोरेश्वर भांडेकर, रमेश नैताम, विधानसभा विस्तारक आकाश सातपुते, दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे,भैय्याजी सोमनकर, माजी नगरसेवक वैष्णवी नैताम, माजी नगरसेवक बेबीताई चीचघरे, पुष्पा करकाडे व सर्व बहुसंख्य तेली समाज बांधव तसेच भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार डाॅ. होळी या बैठकीला उपस्थित राहिल्याने उद्या ४ नोव्हेंबर रोजी नामांकन अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ते आपला अर्ज मागे घेतील हे जवळपास निश्चित झाले आहे.

———————————