बोदीन चकमकीची दंडाधिकारी चौकशी सुरू

59

गडचिरोली, ता. १६ : पेंढरी उप पोलिस स्टेशन पेंढरीअंतर्गत गोडलवाही पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील बोदीन जंगल परिसरात १४ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या पोलिस-माओवादी चकमकीची दंडाधिकारी चौकशी सुरू झाली आहे.

या चकमकीदरम्यान दोन पुरुषाचे मृतदेह अग्निशस्त्रासह आढळले होते. या घटनेतील मृत्युच्या कारणांचा शोध लावणे आवश्यक असल्याने या प्रकरणात दंडाधिकारी चौकशी करण्यात येत आहे. या घटनेची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या आणि चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छीणाऱ्यांनी आपले लेखी निवेदन शपथपत्रासह उपविभगीय दंडाधिकारी, गडचिरोली यांच्याकडे १५ दिवसांच्या आत किंवा तत्पूर्वी सादर करावे, असे आवाहन सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी राहुल कुमार मीना यांनी केले आहे.

—————————–