चोरलेली वाहने विकण्याच्या होता तयारीत…पण सापडला पोलिसांच्या हाती

95
  • ग्लोबल गडचिरोली न्यूज,
  • गडचिरोली, ता. २२ : एका मोटारसायकल चोराला गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. तरुण उर्फ तुषार राजू बुजेवार ( वय २२) रा. हनुमान वाॅर्ड, देसाईगंज जि. गडचिरोली, असे आहे.
  • प्राप्त माहितीनुसार देसाईगंज पोलिस स्टेशन येथे वाहन चोरीबाबात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेतला. पण तो पोलिसांना सापडला नाही. दरम्यान १८ जानेवारी २०२५ रोजी या गुन्ह्याचे तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक संदीप आगरकर यांना तरुण उर्फ तुषार राजू बुजेवार याने आपल्या राहत्या घरी दोन चोरीच्या दुचाकी लपवून ठेवल्या असून ही वाहने तो कोणाला तरी विकण्याच्या तयारीत आहे, अशी गोपनीय माहिती मिळाली. या माहितीवरून वरीष्ठांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक संदीप आगरकर पोलिस पथकासह रवाना झाले. त्यांनी तुरण बुजेवार याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तो उडवा-उडवीची उत्तरे देऊ लागला. त्याच्याकडे वाहनाच्या कागदपत्रांबाबत सखोल चौकशी केल्यावर मात्र त्याने कुठलेही स्पष्टीकरण दिले नाही. त्यानंतर पोलिस स्टेशन येथील अभिलेख तपासले असता वाहन क्र. एम.एच.३५ए.एल.६१७० काळ्या रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल चोरीस गेली असून तिची किंमत अंदाजे ८० हजार रुपये असल्याचे दिसून आले. तसेच वाहन क्र. एम.एच.३३ यू ३९३० होंडा शाईन हीसुद्धा चोरीस गेल्याची नोंद असून तिची किंमत अंदाजे ४५ हजार रुपये असल्याचे आढळून आले. त्यानंतर आरोपी तरुण उर्फ तुषार राजू बुजेवार याचा या दोन्ही मोटारसायकल चोरीत सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्या ताब्यातील दोन्ही दुचाकी वाहन अंदाजे किंमत १ लाख २५ हजार जप्त करून त्याला अटक करण्यात आली. त्याला देसाईगंज येथील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपासात असे दिसून आले की, आरोपी बुजेवार हा पोलिस ठाणे ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर येथील एका खुनाच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक अहेरी डॉ. श्रेणिक लोढा तसेच कुरखेड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात देसाईगंज पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अजय जगताप यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक संदीप आगरकर, मनीष गोडबोले, पोलिस अंमलदार विलास बालमवार, नितेश कढव, सतीश बैलमारे, रोशन गरमडे यांनी पार पाडली.
  • ————————–