ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २२ : जिल्हा व्हॉईस ऑफ मिडिया पत्रकार संघटनेची बैठक ज्येष्ठ पत्रकार मुकुंद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्कीट हाऊस विश्रामगृहात पार पडली. व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या सोबत व्हिडिओ कॉम्फरन्सद्वारे संवाद सांधल्यानंतर या बैठकीत सर्वानुमते व्येंकटेश दुडमवार यांची व्हॉईस ऑफ मीडिया गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर जिल्हा सचिवपदी विलास ढोरे यांची निवड करण्यात आली.

या बैठकीला संजय तिपाले, सुमित पाकलवार, जयंत निमगडे, प्रा. मुनिश्वर बोरकर, चेतन गहाणे, मारोती भैसारे, कालीदास बन्सोड, आशीष अग्रवाल, फिरोज लालानी, रुषी सहारे, सूरज हजारे, सुनिल नंदनवार, हितेश ठेंगे, नितीन ठाकरे, सोमनाथ उईके, मिलिंद खोंड, तिलोत्तमा हाजरा, कृष्णा वाघाडे, शेषराज संगीडवार, आनंद विश्वास, तेजश गुज्जलवार, शरीफ कुरेशी, राहुल अंबादे आदींसह जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते. येत्या काळात तालुकाध्यक्षांची निवडणूक घेण्यात येणार आहे. तसेच जिल्हा कार्यकारिणीत फेरबदल करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. व्यंकटेश दुडमवार हे गडचिरोली जिल्ह्यातील आघाडीचे पत्रकार असून राष्ट्रीय स्तराच्या वृत्तवाहिनीत कार्यरत आहेत. मागील अनेक वर्षांपासून इलेक्ट्राॅनिक मीडियात काम करताना त्यांनी जिल्ह्यातील अनेक समस्यांना वाचा फोडत शोषीत, पिडीतांना व सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून दिला आहे. त्यांच्या उत्कृष्ट पत्रकारितेबद्दल त्यांचा अनेक पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला आहे.
——————————









