Home Gadchiroli पोलिसांनी जप्त केला ५ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल

पोलिसांनी जप्त केला ५ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल

85

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ,,२५ : अवैधरित्या दारू वाहतूक करण्याचा प्रयत्न उधळून लावत गडचिरोली पोलिसांनी गुरुवार (ता २३) चारचाकी वाहनसह ५ लाख ३२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

महेश हेमके, रा. मुडझा, ता. ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर हा अवैधरित्या आपल्या २ साथीदारांच्या मदतीने चारचाकी वाहनाने देशी व विदेशी दारूची चंद्रपूर जिल्ह्यातून वाहतूक करून गडचिरोली पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मोहझरी गावात राहणारा शिवा ताडपल्लीवार यास पुरवठा करणार आहे, अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल आव्हाड व त्यांचे पथक रवाना करण्यात आले. त्यानंतर या पथक रात्री ११. २० वाजता दरम्यान गडचिरोली येथील सत्र न्यायालयासमोरील चौकात सापळा रचून बसले असता एक चारचाकी वाहन भरधाव वेगाने येताना दिसले. पोलिसांनी वाहन चालकाला हात दाखवून वाहन थांबविण्याचा इशारा दिला. त्यानंतर वाहनाची जवळून तपासणी केली. वाहनात अवैध देशी व विदेशी दारू असलेल्या ४० पेटी (बॉक्स) किंमत अंदाजे ३ लाख ३२ हजार ८०० रूपये आढळून आल्या. अवैध दारूसह एक चारचाकी महिंद्र कंपनीचे झायलो वाहन क्र. एम. एच. १४ सी.एस. ४२२१ किंमत अंदाजे २ लाख रुपये असा एकूण ५ लाख ३२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून संबंधीत घटनेच्या अनुषंगाने गडचिरोली पोलिस स्टेशन येथे रंजीत अरुण सरपे ( वय-२५) रा. मुडझा, ता. ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर, चेतन देवेंद्र झाडे (वय २५) रा. मुडझा, ता. ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच या गुन्हयात पाहिजे असलेले दोन आरोपी नामे महेश हेमके, रा. मुडझा, ता. ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर व शिवा ताडपल्लीवार रा. मोहझरी ता. जि. गडचिरोली यांच्या शोध घेणे सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल आव्हाड यांच्या नेतृत्वात पोलिस अंमलदार प्रशांत गरफडे, शिवप्रसाद करमे आणि चालक पोलिस अंमलदार माणिक निसार यांनी पार पाडली.