ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २७ : स्थानिक गडचिरोली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात संत गाडगेबाबा महाराज जयंती व छत्रपती शिव जन्मोत्सव सोहळा सप्ताह कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
आपल्या भटकलेल्या समाजाला जर सुधारायचे असेल, समोर जायचे असेल तर या गाडगेबाबांसारख्या महान संतांचेच विचार व आचार हे जोपासावे लागतील, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अमोल कुळमेथे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विवेक बाबनवाडे, जिल्हा उपाध्यक्ष फहीम काझी, लंकेश सेलोटे, अजय कुकडकर, सेवानिवृत्त वनपाल बळवंत येवले, महिला कार्याध्यक्ष सुषमा येवले, महिला शहराध्यक्ष प्रीती कोवे, आशा मुळेवार, अमृता ईझनकर, शुभम ईझनकर, अजय कोवे, राहुल कोसरे, किरण मंगरे, कविता चिचघरे, रेखा भेंडाळे, वंदना भेंडाळे, प्रतिभा कुळमेथे, सारिका भेंडाळे, साक्षी चिचघरे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










