इनरव्हील क्लब ऑफ गडचिरोलीच्या वतीने महिलेला शिलाई मशीन भेट

144

ग्लोबल गडचिरोली न्यूज

गडचिरोली, ता. ८ : इनरव्हिल क्लब ऑफ गडचिरोलीच्या वतीने गरजवंत महिलेला शिलाई मशीन भेट देण्यात आली.

यमुना हॉल येथे आयोजित कार्यक्रमाला इनरव्हिल क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन जयश्री पोफळे, डिस्ट्रिक्ट व्हाॅईस चेअरमन रमा गर्ग आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात प्रोटोकॉलनुसार झाली. प्रार्थना तसेच दीप प्रज्वलन व स्वागत गीताने सुरुवात करण्यात आली. वैशाली बट्टूवार यांनी स्वागत गीत गायले. गोगाव येथील विद्याभारती हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी गोंधळ सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी इनरव्हिल क्लबच्या अध्यक्ष प्रतिभा रामटेके, सचिव विजया राठोड, कोषाध्यक्ष वैशाली गोट्टमवार, आयएसओ पिंकी राठी, सीसी शिखा काबरा उपस्थित होत्या. इनरव्हिल क्लबच्या वतीने अत्यंत गरजू व मशीन काम करता येणारी महिला श्वेता वामन सोनुले (वय ३५) रा. मु. पो. मुडझा या होतकरू महिलेला शिलाई मशीन भेट देण्यात आली. ही महिला विधवा असून तिच्या पतीचे कोरोनामध्ये निधन झाले. मुलगा दिव्यांग आहे. मुलाची हृदयाची शस्त्रक्रिया झाली आहे. संसाराचा संपूर्ण भार तिच्यावर आहे. अशा महिलेचा शोध अध्यक्ष प्रतिभा रामटेके यांनी घेतला. तिला शिलाई मशीन देण्यात आली. प्रतिभा रामटेके यांनी मार्गदर्शनात सांगितले की, आज मला विश्वास आहे की, आपण श्वेता सोनुले यांना शिलाई मशीन दिली तर त्या कपडे शिवून स्वतःचा संसाराचा गाडा पुढे नेतील. या संधीचे सोने नक्की करतील. यावेळी चेअरमन जयश्री पोपळे यांनीही मार्गदर्शन करत इनरव्हिलबद्दल माहिती सांगितली. कार्यक्रमाला पुनम सूचक, मंजू काबरा, चंचल काबरा, शालू भुसारी, वैशाली पडशीलवार, बर्लावर, शिल्पा हमके तसेच इतर सदस्य उपस्थित होत्या. हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रफुल्ल रामटेके, मिनू रामटेके यांचे स्वागत तसेच अभिनंदन चेअरमन जयश्री पोफळे यांनी केले. विश्राम होकम, नीरज जैन , मंजू काबरा यांचीही मदत झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैशाली गौतमवार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन शिखा काबरा, आभार विजया राठोड यांनी मानले.