गोसेखुर्दच्या पाण्यासाठी वैनगंगा नदी पात्रात काँग्रेसचा एल्गार ग्लोबल गडचिरोली न्यूज,

82

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

 

गडचिरोली, ता. ५ : गडचिरोली – चंद्रपूर जिल्ह्याची जीवनदायीनी समजल्या जाणाऱ्या  वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले असून नदी काठावरील पाण्याची पातळी खालावली आहे. शेतकऱ्यांना शेती करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासोबतच नदी काठावरील गावांतील भूजल पातळी कमी झाल्याने अनेक गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाळीव प्राणी, जंगली जनावरे यांनाही पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. त्यामुळे गोसेखुर्द धरणाच्या पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीत करण्यात यावा या प्रमुख मागणीसह जिल्ह्यातील इतर मागण्यांना घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात शनिवार (ता. ५) गडचिरोली -चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीच्या पात्रात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनास प्रामुख्याने काँग्रेस विधिमंडळ गट नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार, गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनीही उपस्थिती दर्शविली व मार्गदर्शन करून संबंधित अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधत लवकरात लवकर नदीपात्रात पाणी सोडण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे कळविले. एक आठवड्याच्या आत नदी पात्रात गोसेखुर्दचे पाणी न सोडल्यास मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला. यावेळी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष अॅड. विश्वजीत कोवासे, शहराध्यक्ष सतीश विधाते, महिला काँग्रेस अध्यक्ष अॅड. कविता मोहरकर, जिल्हा परीषद माजी उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन नाट, तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, वसंत राऊत, प्रमोद भगत, राजेंद्र बुल्ले, जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव सालोटकर, प्रभाकर वासेकर, युवक काँग्रेस अध्यक्ष नीतेश राठोड, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, अब्दुल पंजवानी, नेताजी गावतुरे, दिवाकर निसार, भूपेंश कोलते, रूपेश टिकले, रमेश चौधरी, नितीन राऊत, वामनराव सासाकडे, दामदेव मंडलवार, दत्तात्रेय खरवडे, अनिल कोठारे, दिलीप घोडाम, सुभाष कोठारे, नितीन राऊत, नरेंद्र गजपुरे, मुन्ना गोंगले, शालिक पत्रे, विजय सुपारे, ढिवरू मेश्राम, उत्तम ठाकरे, जितेंद्र मुनघाटे, जावेद खान, घनश्याम मूरवतकर, मिथुन बाबनवाडे, गौरव येनप्रेड्डीवार, विपुल येलट्टीवार, कुणाल ताजने,  प्रफुल्ल बारसागडे, तेजस कोंडेकर, अमर नवघडे, रवी मेश्राम, चंद्रशेखर धकातेसह मोठ्या संख्येने शेतकी व जिल्ह्यातून आलेले गावकरी यावेळी उपस्थित होते. गडचिरोली येते होणाऱ्या विमानतळाकरीता सुपीक जमिन अधिग्रहित न करता त्यासाठी इतर शासकीय किंवा वनजमिनीचा वापर करण्यात यावा. भेंडाळा ता.चामोर्शी परीसरातील MIDC करिता प्रस्तावित अतिरिक्त क्षेत्र स्थापना करण्याकरिता शासनाने अवलंबिलेले धोरण शेतकऱ्याला देशोधडीला लावणारे असून शेतकऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय जागा अधिग्रहीत करू नये. कोटगल बँरेज करिता अधिग्रहीत करण्यात आलेल्या शेत जमिनीचा मोबदला संबधित शेतकऱ्यांना मिळाला नसून योग्य तो मोबदला  त्वरित देण्यात यावा व जे शेती बारमाही पाण्याखाली बुडीत क्षेत्रात येते अशा शेतीस अतिरिक्त मोबदला देण्यात यावा. मनरेगाअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांचे थकीत असलेले मजुरीचे पैसे त्वरित देण्यात यावे. वडसा – गडचिरोली नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पाकरिता अधिग्रहीत करण्यात येणाऱ्या जमीनधारक सर्व शेतकऱ्यांना नवीन दरानुसार जमिनीचा मोबदला देण्यात यावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.