Home Gadchiroli एसटी बसने पायी चालत असलेल्या युवकाला दिली धडक

एसटी बसने पायी चालत असलेल्या युवकाला दिली धडक

171

गडचिरोली, ता. २६ : अहेरी तालुक्यातील आलापल्लीहून वेलगुरमार्गे मुलचेरा दिशेने जात असलेल्या एसटी महामंडळाच्या बसने एका पायदळ तरुणास धडक दिल्याने तो तरुण गंभीर जखमी झाला.

ही घटना मोदूमडगु गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर घडली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या माहितीनुसार, एसटी बस ही अतिशय सुसाट वेगाने जात होती. या वेगामुळेच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याची शक्यता व्यक्त होत आहे. अपघातग्रस्त तरुणास तत्काळ रुग्णवाहिकेद्वारे अहेरी येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे., एसटी महामंडळाने बसगाड्यांच्या वेगावर नियंत्रण ठेवावे, तसेच चालकांनी अधिक काळजीपूर्वक वाहन चालवावे व जखमी तरुणाला एसटी महामंडळाने तत्काळ मदत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

—————————–