गडचिरोली जिल्ह्याचा विश्व हिंदू परिषद अभ्यास वर्ग उत्साहात
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ७ : विश्व हिंदू परिषद गडचिरोली जिल्ह्याचा तीन दिवसीय अभ्यास वर्ग आरमोरी स्वप्न महल येथे उत्साहात पार पडला.
या अभ्यास वर्गाच्या उद्घाटनाला महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य अद्दलवार, प्रांत सह गोरक्षा प्रमुख मनोज हंबर्डे, विभाग मंत्री पराग दवंडे, धर्मप्रसार जिल्हाप्रमुख पुंडलिक नेवारे महाराज, प्रतिष्ठित व्यापारी चंदू वडपल्लीवार उपस्थित होते. अध्यक्षस्थानी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुशील हिंगे होते. जिल्हा मंत्री शंकर बोरकर, जिल्हा सहमंत्री नानाजी खुणे, जिल्हा सहमंत्री रमेश बोदलकर, प्रखंड मंत्री अनुप असाटी, बजरंग दल जिल्हा संयोजक अमन गहेरवार, आरमोरी प्रखंड मंत्री राजू जराते, आयुष न्यालेवार यांनी अभ्यास वर्गाचे नियोजन केले. समारोपीय कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष पवन नारनवरे व पतंजली योगपीठ जिल्हाध्यक्ष सत्यनारायण चक्कीनारपुवार उपस्थित होते. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुशील हिंगे होते. संपूर्ण प्रखंडातील प्रखंड कार्यकारिणीचे सदस्य कार्यकर्ता या अभ्यास वर्गाला उपस्थित होते. हिंदू धर्मावरील आव्हाने, हिंदू धर्माची सद्य:परिस्थिती व विविध आयामाच्या विषयांवर मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली. संवाद सत्रामध्ये विभागीय मंत्री पराग दवंडे यांनी विश्व हिंदू परिषद कार्यपद्धती कार्यकर्त्यांना सांगितली. बौद्धिक वर्गामध्ये प्रांत सह गोरक्ष प्रमुख मनोज हंबर्डे यांनी विश्व हिंदू परिषद ध्येय व उद्देश या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच विमर्श या विषयावर पराग दवंडे यांनी मार्गदर्शन केले. गटानुसार झालेल्या चर्चेमध्ये पंच परिवर्तन या विषयावर जिल्हा मंत्री शंकर बोरकर यांनी मार्गदर्शन केले. तीन दिवसाच्या अभ्यास वर्गात प्रातःस्मरण व सत्संगाशिवाय बजरंग दल उपासना केंद्र व दुर्गा वाहिनीच्या शक्ति साधना केंद्रात व्यायाम योग सूर्यनमस्कार प्रशिक्षणाशिवाय मैदानी खेळ घेण्यात आले. जिल्हा अभ्यास वर्गात नवीन पदाधिकारी दायित्वाची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये मातृशक्ती जिल्हा संयोजिका योगीता दशमुखे, सहसंयोचिका विद्या जवळे, जिल्हा सत्संग प्रमुख सुधा नाकाडे, वडसा प्रखंड अध्यक्ष डॉ.नेताजी बनसोड, वडसा मातृशक्ती संयोजिका सोमवती लंजे, सहसंयोचिका सुशीला ठलाल, दुर्गा वाहिनी संयोजिका प्रगती जावरे, मूल्य शिक्षण प्रमुख ओमप्रकाश बुद्धे, आरमोरी दुर्गा वाहिनी संयोजिका देणेश्वरी भांडेकर, कुरखेडा प्रखंड सत्संग प्रमुख ईश्वर बनसोड, प्रखंड सहसंयोजक हिमांशू डोकमारे, दुर्गा वाहिनी संयोजिका नैनीता दरवडे, गडचिरोली प्रखंडाच्या दुर्गा वहिनी संयोजिकाश्रावणी हर्षे, आरमोरी प्रखंडाच्या मातृशक्ती संयोजिका तृप्ती चकिनारपूवार तसेच सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना उत्तम कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
—————————










