Home Gadchiroli मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारींची कार्यक्रमस्थळी पाहणी

मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारींची कार्यक्रमस्थळी पाहणी

173

२२ जुलैला “हरित महाराष्ट्र” अभियानांतर्गत गडचिरोलीत एक कोटी वृक्ष लागवडीचा शुभारंभ

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, दि. २१ : “हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील १ कोटी वृक्ष लागवडीचा भव्य शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २२ जुलै रोजी होणार आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज कार्यक्रम स्थळी भेट देत संपूर्ण तयारीचा आढावा घेतला.

गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात २२ जुलै रोजी दुपारी २ वाजता वृक्ष लागवड पंधरवाड्याचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी “हरित महाराष्ट्र” मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात तब्बल ४० लाख झाडे लावण्यात येणार असून, हे अभियान जिल्ह्यात एक कोटी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करणारे ठरणार आहे.

कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी पंडा यांनी आज स्थलपरीक्षण केले. यावेळी कार्यक्रमासाठी करण्यात आलेल्या बैठकीच्या, मांडव व व्यासपीठाच्या व्यवस्थेची पाहणी करून कार्यक्रमाची सुसूत्रता आणि यशस्वी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

 

या पाहणीवेळी अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपवनसंरक्षक श्रीमती आर्या, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. गोकूल, उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) स्मिता बेलपत्रे, एनआयसीचे संजय त्रिपाठी तसेच अन्य संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित⁸ होते.