Home Gadchiroli आसान्या फाउंडेशनचा सेवाभावी उपक्रम

आसान्या फाउंडेशनचा सेवाभावी उपक्रम

135

गडचिरोली, ता. ८ :  आसान्या ( आर्थिक सामाजिक न्याय) फाउंडेशन गडचिरोली व साची गार्डन रेस्टॉरंट अँड ग्रीन वेंचर  गडचिरोली यांच्यातर्फे खरपुंडी ग्रामपंचायतीअंतर्गत खरपुंडी, सालईटोला व माडेतुकूम येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील गरजू मुलांना छत्रीचे वाटप करण्यात आले.

या सेवाभावी उपक्रमात स्टेट बॅंक आॅफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक डोंगरवार, इंडियन बँक व्यवस्थापक विनीत भाजीखाये, साची गार्डन रेस्टॉरंट अँड ग्रीन वेंचरचे प्रकाश शेंडे, खरपुंडीचे माजी सरपंच कमलेश खोब्रागडे, संघमित्रा शेंडे, साची शेंडे, प्रतीक्षा भाजीखाये  मुख्याध्यापक पुंडलिक शेंडे, पेंदाम, भुरले, किरण खोब्रागडे, मुख्याध्यापक कोडापे, भुरसे आदी उपस्थित होते.

—————————–