गडचिरोली, ता. ११ : येथील चार वर्षीय बालिकेवर एका ५० वर्षांच्या व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना जारावंडी येथे घडली. ,या प्रकरणी आरोपी संतोष नागोबा कोंढेकर (वय ५० ) याला पोलीसांनी अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार आरोपी हा प्राथमिक आरोग्य पथक येथे चपराशी या पदावर कार्यरत आहे. पीडीत बालिका त्याच्या घराजवळच राहते. शनिवार (ता.९) सायंकाळी ४ ते ५ वाजताच्या दरम्यान बालिकेला त्याने आपल्या घरी बोलावून तिच्यावर अत्याचार करून पसार झाला,अत्याचार झाल्याची माहिती कळताच पालकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान पीडित बालिकेची प्रकृती बिघडल्याने गडचिरोली येथे महिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला. परंतु प्रकृतीमध्ये सुधारणा न झाल्याने नागपूरला हलवण्यात आले असून बलिकेवर उपचार करण्यात येत असल्याची महिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पसार आरोपीला तत्काळ अटक करण्यात आल्याची माहिती जारावंडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक तेजस मोहिते यांनी दिली आहे.आरोपी वयस्क असून असून त्याला दोन मुलेही आहेत.