पी.एम. विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या वतीने कारागिरांची कार्यशाळा व जनजागृती मेळावा

80

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ५ : पी.एम. विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या वतीने कारागिरांची कार्यशाळा व जनजागृती मेळावा गडचिरोलीत पार पडला.

MSME(विकास कार्यालय) नागपूर व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग विकास मंडळाच्या वतीने सुरू असेल्या पी. एम. विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा फायदा सुतार, लोहार, सोनार,शिंपी कारागीर, शेतकरी कामगार वर्गाला होणार आहे, प्रशिक्षण घेतलेल्या सुशिक्षित बेरोजगार कारागिरांना १५ हजारांची टूल किट मोफत मिळणार आहे. आपला व्यवसाय वाढविण्यासाठी कारागिरांना एक लाखापर्यंतचे कर्ज फक्त ५ ते ६ टक्के व्याज दराने १८ महिन्यांसाठी मिळणार आहे. सर्व वर्गातील कारागिरांनी पी. एम. विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनांचा फायदा घ्यावा, असे आपल्या मार्गदर्शनात पी. एम. विश्वकर्मा कौश्यल्य योजनेच्या सुकाणू समिती सदस्य तथा महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणेचे संचालक प्रमोद पिपरे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. उपस्थित विश्वकर्मा लाभार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणी, लेखा तसेच बाजारपेठेकारिता मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बँक ऑफ इंडियाचे जिल्हा अग्रणी मॅनेजर धोंगडे, असिस्टंट डायरेक्टर MSME नागपूर विद्याधर खरे, गडचिरोली जिल्हा खादी व ग्रामधोग मंडळाचे जिल्हा मॅनेजर भास्कर मेश्राम, काकपुरे, बँक ऑफ इंडिया व मंडळाचे कर्मचारी तसेच जिल्ह्यातील कारागीर वर्ग उपस्थित होते.

————————————–