ग्लोबल गडचिरोली न्यूज
गडचिरोली, ता. २४ : तरुणाईला दिशा, प्रेरणा देणारे व नेतृत्वाला उभारी देणारे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५४ वे विदर्भ प्रांत अधिवेशन ९ ते ११ जानेवारी दरम्यान गडचिरोलीत होणार आहे. या अधिवेशनाच्या पोस्टरचे अनावरण नुकतेच राष्ट्रीय मंत्री पायल किनाके, पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री गीतेश चव्हाण, प्रांत संघटन मंत्री विक्रमजित कलाने, प्रांत सहसंघटन मंत्री मनोज साबळे, प्रांत कार्यालय मंत्री महेश डोकरीमारे, गडचिरोली विभाग संघटन मंत्री राहुल शामकुवर, गडचिरोली नगर मंत्री संकेत मस्के यांच्या उपस्थितीत गडचिरोली येथे करण्यात आले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारी जगातली सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे. यावर्षी अभाविपने देशभरात ७६,९८,४४८ सदस्यांची नोंदणी करून जगातील सर्वांत मोठे विद्यार्थी संघटन म्हणून विक्रम प्रस्थापित केला. या अधिवेशनात विदर्भ प्रांतातील कानाकोपऱ्यातून विद्यार्थी युवक-युवती एकत्रित येत असतात. या अधिवेशनात विविध शैक्षणिक व सामाजिक समस्यांवर सर्व विद्यार्थ्यांचे मत घेऊन त्या समस्या सोडविण्यासाठी प्रस्ताव पारित होतात. या माध्यमातून विदर्भात शोभायात्रा निघून त्यामध्येसुद्धा युवा नेतृत्वाला मंच मिळत असतो. सोबतच प्रांत अधिवेशनात नूतन कार्यकारिणीची निवडदेखील होणार आहे.
————————————————










