लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडकडून कमलापूर एलिफंट कॅम्पच्या हत्ती प्रशिक्षण उपक्रमाला पाठबळ; वन विभागाच्या संयुक्त प्रयत्नांतून व्यवस्थापन अधिक सक्षम

211

ग्लोबल गडचिरोली न्यूज

गडचिरोली, ता. २८ : महाराष्ट्रातील कमलापूर एलिफंट कॅम्प येथे १७ फेब्रुवारी २०२६ ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हत्ती प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. हत्ती आणि महावत यांच्या कौशल्यवृद्धीसोबत परस्पर समन्वय, सुरक्षितता आणि कार्यक्षमता वाढविणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता.

हा उपक्रम Lloyds Metals and Energy Limited (LMEL) यांच्या कॉर्पोरेट एन्व्हायर्नमेंटल रिस्पॉन्सिबिलिटी (CER) अंतर्गत राबविण्यात आला असून कंपनीकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला.

प्रशिक्षणासाठी Teppakadu Elephant Camp, Mudumalai Tiger Reserve (तामिळनाडू) येथील तज्ज्ञ महावत आणि पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. राजेश उपस्थित होते. प्रशिक्षणात आदेश देण्याची पद्धत, हत्तींच्या वर्तनाचा प्रतिसाद, कंडीशनिंग तंत्र, मानवी पद्धतीने हाताळणी, शिस्त, वर्तन व्यवस्थापन तसेच आरोग्य तपासणी व निरीक्षण यांवर विशेष भर देण्यात आला.

हा कार्यक्रम महाराष्ट्राचे प्रधान मुख्य वनसंरक्षक व मुख्य वन्यजीव संरक्षक एम. एस. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्राचे माजी PCCF (वन्यजीव) आणि LMEL चे सल्लागार महिप गुप्ता यांच्या सहकार्याने राबविण्यात आला. सिरोंचा वन विभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, LMEL चे महाव्यवस्थापक अमिताव मलिक आणि उपव्यवस्थापक (वन्यजीव) कुम्मारी स्वामी यांचा या उपक्रमात महत्त्वपूर्ण सहभाग होता.

कार्यक्रमाचे उद्घाटन कमलापूरचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर गौरेश गौतम गडमाडे, प्रोबेशनरी रेंज फॉरेस्ट ऑफिसर अनिरुद्ध माने आणि डॉ. नागेश्वर रामलाल चौहान यांच्या हस्ते पार पडले. वन विभागाचे अधिकारी तसेच LMEL चे प्रतिनिधी निक्षेपन गौड यांच्या समन्वयाने कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली.

कमलापूर एलिफंट कॅम्पच्या विकासासाठी LMEL कडून सिरोंचा वन विभागाला विकासकामांसाठी ₹३४.५३ लाखांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. तसेच कॅम्पमधील पायाभूत सुविधा आणि इतर सोयीसुविधांच्या उन्नतीसाठी कंपनीकडून थेट ₹४० लाख खर्च करण्यात येणार आहेत. या माध्यमातून इको-टुरिझमला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्रशिक्षणाचा समारोप कमलापूर रेंज कार्यालयात झाला. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक (ACF) विष्णु वर्धन रेड्डी (IFS), रेंज फॉरेस्ट ऑफिसर गौतम गडमाडे, रेंज फॉरेस्ट ऑफिसर अनिरुद्ध माने तसेच वन विभाग व कॅम्पचे कर्मचारी उपस्थित होते.

वन विभाग आणि LMEL यांच्या संयुक्त प्रयत्नातून हत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम होण्यासोबतच कमलापूर एलिफंट कॅम्पची कार्यक्षमता आणि आकर्षण वाढण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.