वीर बाबुराव शेडमाके जयंती नवेगावात उत्साहात साजरी

209

ग्लोबल गडचिरोली न्यूज

 

गडचिरोली, ता. १३ : गडचिरोली तालुक्यातील नवेगाव येथील वीर बाबुराव शेडमाके अभ्यासिका, वार्ड क्र. ३ येथे स्वातंत्र्यवीर वीर बाबुराव शेडमाके यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या   वतीने करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून वीर बाबुराव शेडमाके यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील कार्याचा गौरव करत त्यांच्या शौर्य, त्याग आणि देशभक्तीची आठवण करून दिली. त्यांच्या विचारांवर चालत समाजातील अन्यायाविरुद्ध लढण्याचा आणि समाजसेवा करण्याचा संकल्पही उपस्थितांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेत जयंती कार्यक्रम यशस्वी केला. उपस्थितांनी वीर बाबुराव शेडमाके यांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.