गोंडवाना विद्यापीठात ‘कलादर्पण २०२६’ शिक्षक क्रीडा व कला महोत्सव

92

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली , ता. १३ : गोंडवाना विद्यापीठ येथे शिक्षकांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्यामध्ये क्रीडा व कलेप्रती उत्साह वाढावा या उद्देशाने तीन दिवसीय शिक्षक क्रीडा व कला महोत्सव ‘कलादर्पण २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात विद्यापीठासोबत संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षकवृंद मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

या महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन १४ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठ परिसरात होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे हे राहणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे उपस्थित राहणार आहेत.

या तीन दिवसीय महोत्सवात शिक्षकांसाठी विविध क्रीडा स्पर्धा तसेच सांस्कृतिक व कलात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून शिक्षकांमधील दडलेले कलागुण प्रकट होण्याबरोबरच परस्परांतील स्नेह, संवाद आणि एकात्मता अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.

या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण तसेच क्रीडा संचालक डॉ. अनिता लोखंडे यांनी केले आहे.