गोंडवाना विद्यापीठात व्याख्यानाचा कार्यक्रम

108

ग्लोबल गडचिरोली न्यूज
गडचिरोली (Gadchiroli) , ता . १५ : गोंडवाना विद्यापीठात १६ एप्रिल, २०२६ रोजी, सकाळी ११.३० वाजता विद्यापीठाच्या नविन सांस्कृतिक सभागृहात माजी विभागप्रमुख, मराठी विभाग, पिपल्स कॉलेज, नांदेड तसेच सुप्रसिध्द कवी, लेखक, संविधान तज्ज्ञ डॉ. अनंत राऊत, यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. व्याख्यानाचा विषय आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ध्येयवाद साध्य झाला आहे काय ? सदर कार्यक्रम कुलगुरु डॉ. प्रशान्त बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे हे उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी केले आहे .

 

#GondwanaUniversity
#Gadchiroli
#GadchiroliNews
#GlobalGadchiroliNews
#AmbedkarThoughts
#DrBabasahebAmbedkar
#AmbedkarIdeology
#ConstitutionOfIndia
#EducationalEvent
#GuestLecture
#AcademicProgram
#MarathiLiterature
#DrAnantRaut
#ScholarTalk
#IntellectualDiscussion
#YouthAwareness
#SocialThinking
#UniversityEvent
#MaharashtraNews
#KnowledgeSharing
#SamajPrabodhan
#Nandivedh

———————————————