- एखाद्या व्यक्तीला उमेदवार किंवा राजकीय पक्ष यांचा प्रचार करणाऱ्या जाहिराती देता येणार नाहीत. उमेदवाराचा प्रचार करणारी जाहिरात त्या उमेदवाराच्या अनुमतीशिवाय प्रकाशित झाली असल्यास प्रकाशकावर गुन्हा दाखल करता येतो.
मुद्रीत माध्यमाद्वारे मतदान आणि त्यापूर्वीच्या दिवशी प्रकाशित करावयाच्या जाहिरातींचे प्रमाणीकरणही आवश्यक आहे. अशा जाहिरातींबाबतचे अर्ज प्रकाशनाच्या दोन दिवसपूर्वी समितीकडे सादर करने आवश्यक आहे.









