बंगाली समाजाचा अपमान करणारे भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांना तात्काळ पदावरून दूर करावे

204

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

दिनांक 24/09/2024 ला नागपूर ला होणाऱ्या अमित भाई शहा यांच्या कार्यक्रमाला गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून एकही बंगाली समाजाचा प्रतिनिधीला निमंत्रण दिले नाही

 

जो बंगाली समाज गडचिरोली विधानसभा क्षेत्रात भाजपला नेहमी 90 ते 95% टक्के मतदान करतो अश्या समाजातून एकही प्रतिनिधी जिल्हाध्यक्ष यांना दिसत नाही हे शोकांतिका आहे तसेच बंगाली आघाडी विदर्भ प्रभारी दीपकजी हलदार हे असून यांना सुद्धा जाणून बुजून निमंत्रण दिले नाही

 

फक्त आपल्या मार्जितील काही लोकांना बोलावणे इतर लोकांना निमंत्रण न देणे असे गटबाजीचे राजकारण जिल्हाध्यक्ष यांच्या कडून सुरु असून बंगाली समाजाचा वारंवार अपमान करणारे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांना तात्काळ पद मुक्त करावे अन्यथा बंगाली समाज हा अपमान सहन करणार नाही वेळ आली तर रस्त्यावर उतरून जिल्हाधक्ष यांचा निषेध करणार

 

भाजप हा पक्ष सामान्य कार्यकर्ताचा असून कोणाचाही मालकीचा नाही आहे परंतु विद्यमान जिल्हाध्यक्ष हे प्रायव्हेट कंपनी सारखा पक्ष चालवून राहले तसेच भाजप हा लोकशाहीला मानणारा पक्ष आहे परंतु जिल्हाध्यक्ष हे लोकशाहीला न मानता हुकूमशाही सारखे पक्ष चालवण्याचे काम करून राहले अश्या व्यक्तीला जिल्हाध्यक्ष राहण्याचा अधिकार नाही आहे

 

निखिल भारत बंगाली समन्व्य समितीचे पदाधिकारी भाजप बंगाली आघाडी तसेच सरपंच आणि उपसरपंच चे प्रतिनिधी लवकरच बंगाली समाजाचा वारंवार अपमान करणारे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांची तक्रार माननीय विदर्भ संघटन मंत्री डॉ उपेंद्रजी कोटेकर प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बाबनकुले तसेच सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे करणार आहेत

 

संपूर्ण बंगाली समाजाकडून अश्या बंगाली समाजाचा वारंवार अपमान करणाऱ्या जिलाध्यक्ष प्रशांत वाघरे यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे