वांगेपल्ली घाटावर महाशिवरात्री यात्रेनिमित्त भद्राचलम येथून आणलेल्या बारा ज्योतिर्लिंगाचे प्रथमच होणार दर्शन..

352

अहेरी नजीकच्या प्राणहिता नदीकाठी महाशिवरात्री ला भरत असते मोठी यात्रा

गडचिरोली,

महाशिवरात्रीचे औचित्य साधून दिनांक 8 मार्च 2024 रोज शुक्रवारला प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबू( राजस्थान) च्या सौजन्याने बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन सोहळा खास भद्राचलम येथून आणलेल्या बारा ज्योतिर्लिंगाच्या मूर्तीचे दर्शन व अभिषेक, तीर्थ प्रसादाचे वाटप अहेरी नजीकच्या वांगेपल्ली घाटावरील शिव मंदिराजवळ होत आहे. यावर्षी पहिल्यांदाच महाशिवरात्रीनिमित्त भारतातील बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन एकाच ठिकाणी लाभत असल्यामुळे भक्त गणात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे एक भक्तिमय सोहळा पहिल्यांदा अहेरी उपविभागात होत आहे. अहेरी नजीकच्या वांगेपल्ली घाटावर प्राणहिता नदी असून नदी काठी प्राचीन महादेवाचे मंदिर आहे महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी मोठी जत्रा भरत असते नदीत अंघोळ करून महादेवाचे दर्शन व पूजा अर्चना करण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात रिघ लागते. या ठिकाणी दर्शनासाठी महाराष्ट्र व तेलंगाणा येथील भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात .