गडचिरोली, ता. १८ : पतंजली योग समितीतर्फे जागतिक महिलादिनाच्या कार्यक्रमात प्लॅटिनम ज्युबली हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी योगविद्येचे प्रात्यक्षिक दाखवत उपस्थितांची मने जिंकली.

स्थानिक कात्रटवार कॉम्प्लेक्स येथे आयोजित या कार्यक्रमात प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ‘ दीपासन व योग पिरॅमिड आदींचे प्रात्यक्षिक करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले .या कार्यक्रमात योग प्रात्यक्षिकात दिक्षिता सत्यविजय मेश्राम, दुर्वा रवींद्र कुडकावार , सेजल अरविंद कपगते, दिशा प्रदीप बिहानी, अनुष्का अरविंद भैसारे, प्राजक्ता प्रमोद वरगंटीवार, प्रांजली प्रमोद वरगंटीवार आदींनी सहभाग घेतला. योग शिक्षक अनिल निकोडे यांच्या मार्गदर्शनात या विद्यार्थिनींनी योग प्रात्यक्षिक केले. प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय तसेच पतंजली योग समितीचे सर्व पदाधिकारी व इतर मान्यवरांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले.









