डाॅ. नामदेव उसेंडींचा भाजपमध्ये प्रवेश

183

गडचिरोली, ता. २६ : एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना लोकसभेची उमेदवारी न दिल्याने नाराज असलेले कॉंग्रेसचे नेते, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे महासचिव तथा आदिवासी कॉंग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी मंगळवार (ता. २६) दुपारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सायंकाळीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

कॉंग्रेसला गेल्या काही दिवसांपासून एका मागे एक धक्के बसत असल्याचे दिसून येत आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काॅंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपत प्रवेश केला. त्यानंतर मिलिंद देवरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. आता माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच काॅंग्रेसचे डाॅ. नितीन व डाॅ. चंदा कोडवते यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.