गडचिरोली, ता. २७ :
- गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांचे नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आलेले शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक मंगळवार २६ मार्च रोजी पार पडली.

- या बैठकीला शिवसेना संपर्क प्रमुख संदीप बरडे (पाटील), शिवसेना महिला संपर्क प्रमुख वर्षा जितेंद्र मोरे (कुंभारे) यांची प्रमुख उपस्थिती होती. वर्षा मोरे (कुंभारे) यांच्या निवासस्थानी आयोजित या बैठकीत गडचिरोली जिल्ह्यातील,१२ तालुक्यांचा आढावा घेण्यात आला. तालुकानिहाय संघटनात्मक बांधणीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व महिला जिल्हाप्रमुख, सर्व शिवसेना तालुका प्रमुख, महिला तालुका प्रमुख, पदाधिकारी आणि महिला शिवसेना पदाधिकारी तसेच बहुसंख्येने शिवसैनिक उपस्थित होते.









