गडचिरोली, ता. २ : गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील चांदाळा गावामध्ये शिवसेनेच्या वतीने १ एप्रिल २०२४ रोजी आयोजित चर्चासत्र कार्यक्रमात गावातील महिलांनी पक्षप्रवेश घेतला. यावेळी गावातील विविध समस्यांवरही चर्चा करण्यात आली.
शिवसेना महिला संपर्क प्रमुख वर्षा मोरे (कुंभारे), महिला जिल्ह प्रमुख श्रीदेवी वरगंटीवार यांनी चांदाळा येथे भेट दिली. तेथील नागरिकांनी आणि महिलांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन जल्लोषात स्वागत करण्यात आले,त्यानंतर तेथील नागरिकांच्या तसेच महिलांच्या विविध समस्या त्यांनी जाणून घेतल्या,चांदाळा गावातील बहुसंख्य महिलांनी मा.सौ.वर्षाताई जितेंद्र मोरे (कुंभारे) शिवसेना महिला संपर्क प्रमुख गडचिरोली जिल्हा यांचे शुभहस्ते,शिवसेनेत पक्ष प्रवेश केला..यावेळी मौजा चांदाळा येथील नागरिक,महिला बहुसंख्येने उपस्थित होते.
———————————









