वर्षा ताई मोरे (कुंभारे)यांचं आरमोरी विधानसभा क्षेत्राचा गावांना भेट .

127

दि;९ एप्रिल २०२४

 

७ एप्रिल रोज रविवारला,मा.सौ.वर्षाताई जितेंद्र मोरे (कुंभारे) शिवसेना महिला संपर्क प्रमुख गडचिरोली जिल्हा यांनी गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा क्षेत्राचा दौरा केला,आरमोरी विधानसभा क्षेत्रातील अरसोडा, शिवणी,पालोरा,डोंगरी, ठाणेगांव या गावांना मा.सौ.वर्षाताई जितेंद्र मोरे (कुंभारे) यांनी शिवसेना महिला पदाधिकारी सह प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या,दरम्यान तेथील शेकडो च्या संख्येने महिलांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.तसेच विविध पदांच्या नियुक्त्या देण्यात आली.यावेळी शिवसेना आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या महिला जिल्हा प्रमुख मा.सौ.अर्चनाताई गोंदोळे,आरमोरी महिला तालुका प्रमुख मा.सौ.अंकिताताई जवंजाळकर, यासह शिवसेना कामगार संघटनेचे तालुका अध्यक्ष मा.आशिषजी तागडे सर आणि त्यांचे सहकारी यासह आरमोरी विधानसभा क्षेत्रातील महिला शिवसेना पदाधिकारी तसेच शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.