गडचिरोली:दि.१६ ,एप्रिल
महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा खासदार अशोक जी नेते व आमदार बंटीभाऊ उर्फ कीर्ती कुमार भांगडीया यांनी स्वतः बाईक स्वार होऊन श्रीहरी बालाजी गोविंदा.. गोविंदा . जय श्री.रामाच्या जयघोषाने शुभारंभ केला.
आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या नेतृत्वात चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. खा. अशोकभाऊ नेते यांच्या उपस्थितीत व प्रचारार्थ आयोजित ‛भव्य बाईक रॅली’ ला श्रीहरी बालाजी महाराज मंदिर देवस्थान, चिमूर येथून प्रारंभ करण्यात आले .









