छत्तीसगडमधे सर्बात मोठा पोलिस माओवादी चकमकीत 29 माओवादी ठार

141
  • गडचिरोली : दि 16 एप्रिल

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छत्तीसगडच्या कांकेर जिल्हा जवळ छोटे बेटिया थाना क्षेत्र अती संवेदनशील नक्सल प्रभावित गाव आहे.हिदुर कलपरच्या जंगलात पोलीस जवानासोबत छत्तीसगड मधे सर्वात मोठा चकमक झालेली आहे.

कांकेर जिल्हाच एसपी कल्याण अलीसेला व बस्तर चे आइजीपी सुंदर राज यांनी दिलेला माहितीच्या आधारे चकमकी मधे 29 नक्सली ठार झाले.या ठिकाणाहून मोठ्याप्रमाणात आधुनिक रायफल , सात ए के 47 रायफल तीन एल एम जी जप्त करण्यात आले.चकमकीत ठार झालेला शंकर राव, याच्यावर 25 लाखाचे बक्षीस होते.इतर मृतदेहांची ओळख पटवण्यात येत असून यात आणखी काही मोठ्या नक्सली नेत्यांचा समावेश असू शकतो.घटनास्थरावर मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आले असून परिसरात शोधमोहीम रवाबिण्यात ये आहे

.