- गडचिरोली: दि,१९एप्रिल
गडचिरोली शहरातील गोकुल नगर ,आयोध्यानगर,शिवनगर मधील खूप नागरिकांना मतदानाची चिट्टी नाही मिळाली. त्यामुळे लोकांची भटकंती होत आहे . एका बूथ मधून दुसऱ्या बूथ वर आपापल्या नाव मतदार यादी मधे शोधत फिरत आहेत .काही लोकांना आपले नाव मतदार यादी मधे मिळत नसल्यामुळे नाराज होऊन घरी वापस जात आहेत. जे लोक खूप वर्षांपासून गडचिरोली शहराचे रहिवाशी आहेत आणि या अगोदर मतदान केल्या आहेत अश्या पण लोक मतदान पासून वंचित राहण्याची शक्यता आहे.









