गडचिरोली दि. 23-4-2024
भगवान श्रीरामाचा परमभक्त म्हणून बजरंगबलीची पूजा केली जाते.भगवान हनुमानाला पवनसुत, महावीर, कपिश आणि अंजनेय अशा अनेक नावांनी संबोधले जाते. हनुमानाची उपासना केल्याने शारिरीक आणि मानसिक दुःख, रोग, भयाचा अंत होतो. श्री हनुमान जन्मोत्सव निमित्य आज सेमाना देवस्थान गडचिरोली येथे श्रेया व आधारविश्व फाउंडेशन तर्फे साबुदाणा खिचडी वाटप करण्यात आली.मोठ्या संख्येने बजरंगबली भक्त श्रीरामाचा जयघोष करीत प्रसादाचा आनंद घेत होते.सर्व नागरिकांना श्री हनुमान जन्मोत्सवच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी श्रेया संस्थाचे अध्यक्ष सुशिल हिंगे व आधारविश्व फाऊंडेशन च्या अध्यक्षा सौ गीता हिंगे, सदस्या सुनीता आलेवार, सीमा कन्नमवार ,साधना कंदोटीवार,प्रतिमा सोनवणे , भूमिका बरडे,भूमी कोंडावार, आशिष रोहनकर,निखिल पेटकर तसेच दोन्ही संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.









