मौजा- तुलान माल ता.ब्रम्हपुरी येथील भाजपा बुथ प्रमुख सुरेश तुपट यांची तब्बेत संबंधित खासदार अशोक जी नेते व माजी आमदार प्रा.अतुल भाऊ देशकर यांनी त्यांच्या स्वघरी जाऊन भेट घेतले
गडचिरोली :
ब्रम्हपुरी तालुक्यातील मौजा-तुलान माल येथील भाजपाचे बुथ प्रमुख श्री.सुरेश तुपट यांची बरेच दिवसापासून (अर्धांग वायू ) लकवा मुळे प्रकृती गंभीर असल्याचे कळले.पण निवडणुकीच्या धामधूमीत येणे शक्य झाले नाही.तरीपण ब्रम्हपुरी येथे दोऱ्यावर आले असता या संबंधित माहिती झाल्यानंतर दिंनाक २४ एप्रिल २०२४ रोज बुधवारी खासदार अशोकजी नेते व माजी आमदार प्रा.अतुल भाऊ देशकर यांनी भेट घेत आस्थेने त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली व तब्येतीची काळजी घ्यावी.असे बोलत यावेळी आर्थिक मदत सुद्धा दिली.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष अरुणजी शेंडे,भाजपा जेष्ठ नेते डॉ. बालपांडे जी,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ.वंदनाताई शेंडे,
युवा मोर्चा जिल्हा महामंत्री तनयजी देशकर कृ.उ.बा. स. संचालक यशवंतजी आंबोरकर, माजी उपसरपंच राजकुमार कुतरमारे,जेष्ठ नेते प्रभु कार, विश्वनाथ मडावी,मच्छीमार आ.अध्यक्ष योगाजी नागापुरे, बिशन श्रीरामे,आशती कार,
तसेच मोठ्या संख्येने गावातील नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते.









